Pune Mahanagarpalika Bharti 2022 :
पूणे महानगरपालिकेने समाज विकास विभाग भरती अंतर्गत अस्थायी पदावर 06 महिन्यांकरिता करार पद्धतीने एकवट मानधनावर सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशीलवार तक्ता, त्यानुसार पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती, गुणदान पद्धतीचा तक्ता पुणे महानगरपालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती (recruitment) सदरामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांनी दि.31/10/200 ते दि. 01/11/2022 रोजी सकाळी 11.00 ते सायं. 05.00 पर्यंत या वेळेत एस. एम. जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे येथे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करावेत. उमेदवाराने सादर करावयाचा अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे.
पुणे महानगरपालिका भरती 2022 संक्षिप्त तपशील
पुणे महानगरपालिकेने विविध पदांच्या 229 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती संबंधित संक्षिप्त तपशील या लेखात खाली तक्त्यामध्ये नमूद केलेला आहे.
एजन्सिचे नाव | पुणे महानगरपालिका (PMC) |
पदाचे नाव | विविध पदे |
एकूण जागा | 229 |
अर्ज करण्याची पद्धत | विहित नमुन्यात अर्ज सादर करावा |
अर्ज करण्यास सुरुवात | 31 ऑक्टोबर, 2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 नोव्हेंबर, 2022 |
अर्ज सादर करण्याचे ठिकाण | एस. एम. जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे |
अधिकृत वेबसाईट | www.pmc.gov.in |
Pune Mahanagarpalika Recruitment 2022 डाऊनलोड अधिसूचना
पुणे महानगरपालिकेने विविध पदांच्या एकूण 229 रिक्त जागांसाठी 20 ऑक्टोबर, 2022 अधिसूचना पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली आहे. खाली या लेखांमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार पुणे महानगरपालिका भरती 2022 ची अधिसूचना डाऊनलोड करू शकतात.
Pune Mahanagarpalika Recruitment 2022 अधिसूचनेची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पुणे महानगरपालिका भरती 2022 डाऊनलोड अर्जाचा नमुना
पुणे महानगरपालिकेने त्यांच्या www.pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना प्रसिद्ध केला आहे. उमेदवार खाली या लेखामध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुणे महानगरपालिका भरती 2022 चा विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना डाऊनलोड करु शकतात.
PMC Bhari 2022 विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पदांचा तपशील
समाज विकास विभाग अंतर्गत खालील अस्थायी पदावर 06 महिन्यांकरीता करार पद्धतीने एकवट
मानधनावर सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव | रिक्त पदे |
समुपदेशक | 19 |
समूहसंघटिका | 90 |
कार्यालयीन सहाय्यक | 20 |
व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक | 01 |
रिसोर्स पर्सन | 04 |
विरंगुळा केंद्र समन्वयक | 10 |
सेवा केंद्र मुख्य समन्वयक | 06 |
सेवा केंद्र समन्वयक | 14 |
संगणक रिसोर्स पर्सन | 02 |
स्वच्छता स्वयंसेवक | 21 |
फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन ॲडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक | 01 |
वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक | 01 |
फ्रिज ऐसी दुरुस्ती प्रशिक्षक | 01 |
मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक | 01 |
फैशन डिझायनिंग प्रशिक्षक | 03 |
एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक | 01 |
ब्युटी पार्लर प्रशिक्षक | 03 |
दुचाकी वाहन प्रशिक्षक | 01 |
दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | 01 |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक | 01 |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | 01 |
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक | 02 |
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक | 03 |
जेन्टस् पार्लर (बेसीक व ॲडव्हान्स) प्रशिक्षक | 01 |
संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक | 02 |
संगणक बेसिक MS CIT. TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक | 06 |
शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ) | 01 |
एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार | 01 |
प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक | 03 |
प्रशिक्षण केंद्र समन्वयक | 03 |
प्रकल्प समन्वयक | 02 |
प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक | 03 |
एकूण | 229 |
वयोमर्यादा
समाज विकास विभागाकडे कार्यरत असणारे उमेदवार | 58 वर्षांपर्यंत |
खुला प्रवर्ग | 38 वर्षांपर्यंत |
मागासप्रवर्ग | 43 वर्षांपर्यंत |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
समुपदेशक | एम.एस.डब्ल्यू / एम.ए. (मानसशास्त्र)/ कौन्सिलिंग डिप्लोमा | समुपदेशनाचा किमान 1 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाकडील समुपदेशनाचा किनाम 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य |
समूहसंघटिका | पदवीधर/एम.एस.डब्ल्यू / एम. ए. मानसशास्त्र अथवा समाजशास्त्र | वस्तिपातळीवरील किमान 1 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य |
कार्यालयीन सहाय्यक | इ. १२ वी पास, मराठी टायपिंग प्रती मिनीट ३० किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रती मिनीट ४०, एम. एस. सी. आय. टी. | कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाकडील किमान 2 वर्षाचा अनुभव असणान्यास प्राधान्य |
व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक | एम.कॉम / एमएसडब्ल्यू हो. बी. एम. | बचतगटांना व्यवसाय निवड प्रकल्प अहवाल तयार करणे मार्केट मिळवून देणे इ. बाबतचा किमान 5 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाकडील किमान 5 वर्षाचा अनुभवन्यास प्राधान्य |
रिसोर्स पर्सन | एम.कॉम / एम. एम. कल्यू.श्री.एम. | बचतगटांना व्यवसाय निवड प्रकल्प अहवाल तयार करणे मार्केट मिळवून देणे इ. बाबतचा किमान 2 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाकडील किमान 2 वर्षाचा अनुभवन्यास प्राधान्य |
विरंगुळा केंद्र समन्वयक | किमान 12 वी उत्तीर्ण | शासकीय किंवा सामाजिक संस्था यामध्ये किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 1 दर्शया अनुभव असणान्यास प्राधान्य |
सेवा केंद्र मुख्य समन्वयक | इ. 10 वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था/ शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक पुर्ण केलेला असावा (उदा. वामन प्लंबर [गवंडीकाम, सुतारकाम अभ्या | ट्रेड कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव (वायरमन, पलंबर, गवडीकाम सुतारकाम इ.). पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य |
सेवा केंद्र समन्वयक | इ.7 वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था/ शासनमान्य साय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा (उदा. वायरमन प्लंबर, गाडीकाम, सुतारकाम इ. अभ्यासक्रम) | ट्रेड कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव (वायरमन प्लंबर, गडीकाम सुतारकाम, इ.). समाज विकास विभागाकडील किमान २ वर्षांचा अनुभव असणान्यास प्राधान्य |
संगणक रिसोर्स पर्सन | इ. 12 वी पास, मान्यता प्राप्त संगणक संस्थेमधील संगणक हार्डवेअर/ सॉफ्टवेअर विषयक कोर्स पूर्ण केलेला असावा. | D82 सॉफ्टवेअर वापरण्याचा किमान 2 वर्षांचा अनुभव, पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाकडील किमान 2 वर्षाचा अनुभव असणान्यास प्राधान्य |
स्वच्छता स्वयंसेवक | 4 थी उत्तीर्ण | नाही |
फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन ॲडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक | 1 वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षांचा अनुभव |
वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक | 1 वर्ष कालीचे विषयांत शासनमान्य आयटीआय उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
फ्रिज ऐसी दुरुस्ती प्रशिक्षक | विषयाकित डिप्लोमा / शासनमान्य आय. टी. आय उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक | डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक) / विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण/ एम. सी. व्ही. सी. | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
फैशन डिझायनिंग प्रशिक्षक | शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षांचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक | विषयात एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
ब्युटी पार्लर प्रशिक्षक | ब्युटीपार्लर एबीटीसी सिस्को प्रशिक्षण उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
दुचाकी वाहन प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन. सी. टी. व्हि. टी उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक | इ. 12 वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन परीक्षा [जी] 60.प्र.मि., [मराठी] 40.प्र.मि. व हिंदी 40. श.प्र.मि. उत्तीर्ण, एमएससीआयटी उत्तीर्ण. | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक | बी.ए. (इंग्लिश) / एम.ए (इंग्लिश) | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
जेन्टस् पार्लर (बेसीक व ॲडव्हान्स) प्रशिक्षक | ब्युटीपार्लर एबीटीसी / सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक | बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
संगणक बेसिक MS CIT. TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक | बी.सी.ए./एम.सी.ए बी. सी. एस. / एम.सी.एस./ एम. सी. एम. | विषय शिकविण्याचा 2 वर्षाचा अनुभव |
शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ) | — | विषयांकित कामाचा 3 वर्षाचा अनुभव |
एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार | — | विषयांकित कामाचा 3 वर्षाचा अनुभव |
प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक | इ. 12 वी पास, मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट 30 किंवा झाजी टायपिंग शब्द प्रती मिनीट 40, एम. एस. सी. आय. टी. | सदर कामाचा 3 वर्षाचा अनुभव |
प्रशिक्षण केंद्र समन्वयक | MSW / पदवीधर MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल | समाज उपयोगी कामाचा 3 वर्षाचा अनुभव |
प्रकल्प समन्वयक | MSW / पदवीधर MSW उमेदवारास प्राधान्य देणेत येईल | समाज उपयोगी कामाचा 3 वर्षाचा अनुभव |
प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक | साक्षर | — |
निवडप्रक्रिया
वरील पदांवरील नेमणूका शैक्षणिक पात्रता, शासकीय व निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडील (नागरवस्ती विकास योजना) कामाचा अनुभव इ. च्या आधारे परिक्षण करून व गुणानुक्रमे निवड व प्रतिक्षा यादी तयार करून सहा महिने मुदतीकरीता करार पद्धतीने नेमणूक करण्यात येतील.
निवडीसाठी खालीलप्रमाणे अनुभव शैक्षणिक पात्रतेनुसार गुणानुक्रमाचा विचार केला जाईल:-
अ | श्रेणी | इ. 10 वी | इ. 12 वी | एम.एस. डब्ल्यू / एम.ए. (मानसशास्त्र)/ डिप्लोमा / पदवीधर/ एम. ए. मानसशास्त्र अथवा समाजशास्त्र / एम. कॉम / बी.ए./ डी. बी. एम. / बी.ए (इंग्लिश) / एम.ए (इंग्लिश) / बी. ई. (इलेक्ट्रॉनिक) / बी.सी.ए / एम.सी.ए./बी.सी.एस./ एम.सी.एस./ एम.सी.एम | संबंधित विषयांचे शासनमान्य प्रशिक्षण / शासनमान्य आय.टी.आय./ डिप्लोमा / डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक) / शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचे प्रशिक्षण / ब्युटीपार्लर एबीटीसी / सिडेस्को प्रशिक्षण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी/किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था / शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम |
गुण | 5 | 5 | 10 | 10 | |
विशेष श्रेणी | 5 | 5 | 10 | 10 | |
प्रथम श्रेणी | 4 | 4 | 8 | 8 | |
द्वितीय श्रेणी | 3 | 3 | 6 | 6 | |
उत्तीर्ण श्रेणी | 2 | 2 | 4 | 4 |
ब | समाज विकास विभागाकडे काम केल्याचा अनुभव | शासकीय व निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव | शिलाई मशिन्स दुरुस्तीकार, एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार या पदाकरीता खाजगी क्षेत्राचा अनुभव | |
गुण | 10 | 5 | 5 | |
0 ते 1 वर्ष पर्यंत | 4 | 2 | 2 | |
1 वर्ष पुढील ते 5 वर्ष पर्यंत | 6 | 3 | 3 | |
5 वर्ष पुढील ते 10 वर्ष पर्यंत | 8 | 4 | 4 | |
10 वर्षाचे पुढे | 10 | 5 | 5 |
क) कार्यालयीन सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक या पदाकरीता
क | तांत्रिक कौशल्य पात्रता कार्यालयीन सहाय्यक या पदाकरीता – (मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट ३० / इंग्रजी टायपिंग शब्द प्रती | मिनीट ४० कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक या पदाकरीता ( इंग्रजी टायपिंग / शब्द प्रती मिनीट ६० / मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट ४० / हिंदी टायपिंग शब्द प्रती मिनीट ४०) | संगणक कौशल्य पात्रता (एम.एस. सी.आय.टी.) | |
गुण | 5 | 5 | |
A above 75% | 5 | 5 | |
B-61 to 75% | 4 | 4 | |
C-50 to 60% | 3 | 3 | |
D-40 to 50% | 2 | 2 |
इ) संगणक रिसार्स पर्सन (कॉम्युटर हार्डवेअर) या पदाकरीता
संगणक कौशल्य पात्रता ( मान्यता प्राप्त संगणक संस्थेमधील | संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअर विषयक कोर्स)
गुण | 10 |
A above 75% | 10 |
B-61 to 75% | 8 |
C-50 to 60% | 6 |
Pune Mahanagarpalika Bharti 2022 चा अर्ज कसा करावा?
• पुणे महानगरपालिका भरती 2022 चा अर्ज विहित नमुन्यात करायचा आहे. अर्जाच्या विहित नमुन्याची लिंक या लेखांमध्ये वरती दिलेल्या आहे उमेदवाराने या लिंक वर क्लिक करून अर्जाची प्रत डाऊनलोड करावी.
• अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान्त परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयंसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
• अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची (राजपत्र) स्वयंसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
• कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट 30 किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रती मिनीट 40 उत्तीर्ण असल्याचे महाराष्ट्र स्टेट कॉन्सिल ऑफ एक्झॅमिनेशन यांचे व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांचे एम. एस. सी. आय. टी. कोर्स अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
• कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी मराठी टायपिंग शब्द प्रती मिनीट 30 किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रती मिनीट 40 उत्तीर्ण असल्याचे महाराष्ट्र स्टेट कॉन्सिल ऑफ एक्झॅमिनेशन यांचे व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांचे एम. एस. सी. आय. टी. कोर्स अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
• गुणदान पद्धतीचा तक्ता व अटी व शर्ती बाबत माहिती या लेखात वरती निवडप्रक्रिया या Heading मध्ये दिलेली आहे.
• अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी (पेजींग) करून एस. एम. जोशी हॉल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे 11 या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून दि. 31/10/2022 ते दि.01/11/2022 रोजी सकाळी 11.00 ते सायं. 5.00 पर्यंत सादर करणेत यावा. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना दाखविणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार स्वयंसाक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र सोबत कागदपत्रे साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे.
• अजमध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रती जोडलेल्या नसल्यास सदरचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रांत काही दोष आढळल्यास अशा नेमणूका बाद करण्यात येतील.
• निवड झालेल्या उमेदवारांना विहीत नमुन्यात करारनामा करून फक्त 06 महिन्यांकरीता नेमणूक दिली जाईल. करार संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. त्याकरिता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
• निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल.
• निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार मा. अति. महापालिका आयुक्त (वि.), पुणे महानगरपालिका, पुणे यांनी राखून ठेवले आहेत.
• सदर नियुक्त्या मानधन तत्वावर होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायमस्वरूपी नियुक्तीकरीता हक सांगता येणार नाही. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र ठरणार नाहीत.
• निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रूजू होण्यापूर्वी एका महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल, त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यास सुरुवात | 31 ऑक्टोबर, 2022 (11. 00 – 5.00) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 नोव्हेंब, 2022 (11. 00 – 5.00) |
अधिकृत वेबसाईट | www.pmc.gov.in |
अधिसूचना (Notification) | येथे पाहा |
अर्जाचा नमुना | येथे पाहा |
इतर जाहिराती
SBI CBO Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सीबीओच्या 1422 पदांची भरती