MPSC Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 315 अन्वये अर्जदाराच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे. MPSC Recruitment 2022 (MPSC Bharti 2022) 88 वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता, अधीक्षक, फार्मासिस्ट आणि सहाय्यक पदांसाठीची अधिसूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. या लेखांमध्ये आम्ही या भरती संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून दिलेली आहे तरी उमेदवारांनी हा लेख पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
MPSC Recruitment 2022 संक्षिप्त तपशील
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
एकूण पदे | 88 |
पदांचे नाव | वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता, अधीक्षक, फार्मासिस्ट आणि सहाय्यक (Law) |
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात | 25 ऑक्टोबर 2022 |
ऑनलाइन अर्ज सादर करणे शेवटची तारीख | 14 नोव्हेंबर 2022 |
निवड प्रक्रिया | 1) स्क्रीनिंग टेस्ट 2) मुलाखत |
अधिकृत वेबसाईट | www.mpsc.gov.in |
Maharashtra Public Service Commission recruitment 2022 पदांचा तपशील
पदाचे नाव | रिक्त पदे |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ | 07 |
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट – अ | 03 |
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट – ब (प्रशासन विभाग) | 65 |
औषध निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट – ब | 01 |
सहाय्यक (विधी/Law) गट – ब | 12 |
एकूण | 88 |
MPSC Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता व अनुभव
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ | जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे किंवा त्याच्या समकक्ष म्हणून सरकारने घोषित केलेली इतर कोणतीही पात्रता असणे आवश्यक. | भूवैज्ञानिक क्षेत्रीय कामाचा किंवा खनिज प्रशासनाच्या कामाचा 5 वर्षांचा व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक. |
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट – अ | इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून सरकारने घोषित केलेली इतर कोणतीही पात्रता असणे आवश्यक. | विद्युत अभियंता म्हणून किमान 08 वर्षांचा अनुभव धारण करणे आवश्यक आहे. त्यापैकी कार्यशाळा किंवा विजेची निर्मिती, पारेषण व वितरण किंवा विद्युत अधिनियम 2003 (2003 चा 36) खालील तयार करण्यात आलेल्या नियम यांच्या प्रशासनाच्या कामातील (कार्यालयीन कामकाज) 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट – ब (प्रशासन विभाग) | किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक. | सरकारी कार्यालयात किंवा मोठ्या आस्थापनेमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी नसलेल्या पर्यवेक्षी (supervisory) क्षमतेचा अनुभव असणे आवश्यक |
औषध निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट – ब | B.A.M.S. (आयुर्वेदाचार्य) | संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव |
सहाय्यक (विधी/Law) गट – ब | विधी (Law) पदवी उत्तीर्ण प्राधान्यशील अर्हता :- विधी ( Law) पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण | — |
एकूण | 88 |
वयोमर्यादा
वरील पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवून दिलेल्या वयाच्या निकषांची खात्री करावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2022 रोजी विचारात घेतले जाईल. [राखीव श्रेणी/EWS/अनाथ : 05 वर्षे सूट]
पदाचे नाव | वयोमर्यादा |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ | 18-38 वर्षे |
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट – अ | 18-38 वर्षे |
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट – ब (प्रशासन विभाग) | 25-38 वर्षे |
औषध निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट – ब | 18-38 वर्षे |
सहाय्यक (विधी/Law) गट – ब | 25-38 वर्षे |
ऑनलाइन अर्जाचे शुल्क
महाराष्ट्र लोकसेवा भरती 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला उमेदवाराच्या श्रेणीनुसार खाली नमूद केल्याप्रमाणे नॉन-रिफंडेबल अर्ज शुल्क भरावे लागेल.
पदाचे नाव | अराखीव | मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/ दिव्यांग |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ | रु. 719/- | रु. 449/- |
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट – अ | रु. 719/- | रु. 449/- |
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट – ब (प्रशासन विभाग) | रु. 719/- | रु. 449/- |
औषध निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट – ब | रु. 719/- | रु. 449/- |
सहाय्यक (विधी/Law) गट – ब | रु. 394/- | रु. 294/- |
वेतन श्रेणी
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ | रु. 60, 000 /- ते रु. 1,90,800/- |
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट – अ | रु. 67, 700 /- ते रु. 2,08,700/- |
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट – ब (प्रशासन विभाग) | रु. 38, 600 /- ते रु. 1,22,800/- |
औषध निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट – ब | रु. 44, 900 /- ते रु. 1,42,400/- |
सहाय्यक (विधी/Law) गट – ब | रु. 41, 800 /- ते रु. 1,32,300/- |
MPSC Recruitment 2022 डाउनलोड PDF जाहिरात
पदाचे नाव | PDF जाहिरात लिंक |
वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट-अ | येथे डाऊनलोड करा |
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट – अ | येथे डाऊनलोड करा |
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट – ब (प्रशासन विभाग) | येथे डाऊनलोड करा |
औषध निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट – ब | येथे डाऊनलोड करा |
सहाय्यक (विधी/Law) गट – ब | येथे डाऊनलोड करा |
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात | 25 ऑक्टोबर 2022 |
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 14 नोवेंबर 2022 |
ऑनलाइन पद्धतीने अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 14 नोव्हेंबर 2022 |
SBI मध्ये चलनाद्वारे अर्जाचे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची शेवटची तारीख | 16 नोव्हेंबर 2022 |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 17 नोव्हेंबर 2022 |
निवड प्रक्रिया
• निवड स्क्रीनिंग व मुलाखतीद्वारे होईल
• प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
• जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
• चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
• चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
• चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
• मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/home |
डाउनलोड अधिसूचना (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | Apply Here |
MPSC Recruitment 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
• सर्वप्रथम hittps://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
• आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे..
• खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
• विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
• परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
• संबंधित जाहिरातीस अनुसरुन विहित निकष / पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
• आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
• अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या ‘Submit and Pay fees’ या बटनवर क्लिक केल्यानंतर किंवा मुख पृष्ठावरील ‘माझे खाते’ या सदराखालील अर्ज केलेल्या पदांच्या यादीतील ‘Fees not Paid’ अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात/ पद / परीक्षेसमोरील ‘ Pay Now’ या लिंकवर क्लिक करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल.