महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 | Maharashtra Police Constable Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 | Maharashtra Police Constable Bharti 2022

महाराष्ट्र राज्य पोलिसांनी शिपाई आणि चालक, सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र पोलीस शिपाई भारती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई, चालक (Driver), राज्य राखीव पोलीस दल (SRPF) या पदांच्या 18331 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवार 09 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. त्यासंबंधीची अधिसूचना महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Table of Contents

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संक्षिप्त तपशील (Maharashtra Police Bharti 2022 Overview)

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2022 ची यादी 9 नोव्हेंबर 2022 रोजी mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या भरती संबंधित संक्षिप्त तपशील या लेखामध्ये खाली दिलेला आहे तो उमेदवारांनी तपासावा.

भरती मंडळामहाराष्ट्र राज्य पोलीस
पदाचे नावमहाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई, चालक (Driver), राज्य राखीव पोलीस दल (SRPF)
एकूण जागा18331
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 9 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2022
महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी प्रवेशपत्र31 डिसेंबर 2022
निवड पद्धतशारिरीक चाचणी (Physical Test)
लेखी परीक्षा (Written Test)
वैद्यकीय चाचणी (Medical Test)
अधिकृत वेबसाईटwww.mahapolice.gov.in

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अधिसूचना (Maharashtra Police Bharti 2022 Notification)

महराष्ट्र पोलीस संचालनालयाने महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अधिसूचना (Maharashtra Police Bharti 2022 Notification) 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली आहे. या भरतीच्या अधिसूचनेची PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना (Notification) संपूर्ण काळजीपूर्वक वाचा.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अधिसूचना (Maharashtra Police Bharti 2022 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 ऑनलाईन अर्ज (Maharashtra state police recruitment 2022 online application)

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज (Maharashtra state police recruitment 2022 online application) सादर करण्यास 9 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता अगोदरच अर्ज सादर करावा. उमेदवार खाली या लेखात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 ऑनलाईन अर्ज (Maharashtra state police recruitment 2022 online application) करण्यासाठी येथे क्लिक करा

रिक्त जागांचा तपशील (Vacancy Details)

महाराष्ट्र पोलीस शिपाई भारती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई, चालक (Driver), राज्य राखीव पोलीस दल (SRPF) या पदांच्या 18331 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार खाली दिलेला पदांचा तपशील पाहू शकतात.

पद क्र.पदाचे नावरिक्त पदे
1. पोलीस शिपाई14956
2.चालक 2174
3.सशस्त्र पोलीस शिपाई1201
एकूण18331
I) पोलीस शिपाई व चालक :-
अ. क्र.घटकाचे नावपोलीस शिपाईचालक
1.पो. आ. बृहन्मुंबई7076194
2.पो. आ. ठाणे शहर521
3.पो. आ. पुणे शहर72075
4.पो. आ. पिंपरी चिंचवड216
5.पो. आ. मिरा भाईंदर98610
6.पो. आ. नागपूर शहर308121
7.पो. आ. नवी मुंबई204
8.पो. आ. अमरावती शहर2021
9.पो. आ. सोलापूर शहर9873
10.पो. आ. लोहमार्ग मुंबई620
11. पो.अ. ठाणे ग्रा.6848
12.पो.अ. रायगड27206
13.पो. अ. पालघर21105
14. पो.अ. सिंधुदूर्ग9922
15.पो. अ. रत्नागिरी131
16.पो.अ. नाशिक ग्रा.16415
17.पो.अ. अहमदनगर12910
18.पो.अ. धुळे42
19.पो.अ., कोल्हापूर24
20.पो.अ. पुणे ग्रा.57990
21.पो.अ. सातारा145
22.पो.अ. सोलापूर ग्रा.2628
23.पो.अ. औरंगाबाद ग्रा.3915
24.पो.अ. नांदेड15530
25.पो.अ. परभणी75
26.पो.अ.
हिंगोली
21
27.पो. अ. नागपूर ग्रा.13247
28.पो.अ.. भंडारा6156
29.पो.अ. चंद्रपूर19481
30.पो.अ. वर्धा9036
31.पो.अ. गडचिरोली348160
32. पो.अ. गोंदिया17222
33.पो.अ. अमरावती ग्रा.15641
34.पो.अ. अकोला32739
35.पो. अ. बुलढाणा51
36.पो.अ. यवतमाळ24458
37.पो. अ. लोहमार्ग पुणे124
38.पो.अ. लोहमार्ग औरंगाबाद108
39.लातूर29
40.पो. अ. वाशिम14
41.पो. आ. लोहमार्ग नागपूर28
एकूण149562174
II) सशस्त्र पोलीस शिपाई :-
अ. क्र.घटकाचे नावरिक्त पदे
1. रा. रा. पो. बल, गट-1, पुणे119
2.रा. रा. पो. बल, गट-2, पुणे42
3.रा. रा. पो. बल, गट- 4, नागपूर,54
4.रा. रा. पो. बल, गट-5, दौड71
5.रा. रा.पो.बल, गट-6, धुळे56
6.रा. रा. पो. बल, गट-7, दौड110
7.रा. रा. पो. बल, गट-8, मुंबई75
8.रा. रा. पो. बल, गट-10, सोलापूर33
9.रा. रा. पो. बल, गट-15, गोंदिया40
10.रा. रा. पो. बल, गट-16. कोल्हापूर73
11.रा. रा. पो. बल, गट-18, काटोळ, नागपुर243
12.रा. रा. पी. बल, गट-19, कुसडगांव, अहमदनगर278
एकूण1201

वयोमर्यादा (Agelimit)

(i) वयोमर्यादा:- दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील:

A. पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी वयोमर्यादा :-
प्रवर्ग किमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
खुला 18 वर्षे28 वर्षे
मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती, वि.जा. – अ, भ.ज. ब, भ.ज.-क, भ.ज. ड. वि.मा.प्र., इ.मा.व., इ.डब्ल्यू.एस.)18 वर्षे33 वर्षे
प्रकल्पग्रस्त उमेदवार18 वर्षे45 वर्षे
भूकंपग्रस्त उमेदवार18 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक उमेदवार18 वर्षेउमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 03 वर्षे इतकी राहील.
पदवीधर
पदविकाधारक
अंशकालीन उमेदवार
18 वर्षे55 वर्षे
अनाथ18 वर्षे33 वर्षे

समांतर आरक्षणांतर्गत येणारे उमेदवार :- किमान वयोमर्यादा 18 वर्षे.

प्रवर्ग कमाल वयोमर्यादा (खुला प्रवर्ग)कमाल वयोमर्यादा (मागास प्रवर्ग)
खुला 28 वर्षे33 वर्षे
खेळाडू उमेदवार28 + 5 वर्षे33 + 5 वर्षे
पोलीस पाल्य28 वर्षे33 वर्षे
गृहरक्षक28 वर्षे33 वर्षे
माजी सैनिकावर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) उमदेवार28 + 3 वर्षे33 + 3 वर्षे

टीप :- 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गांचे उमेदवार, निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2020 व सन 2021 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी, एक वेळची उपाययोजना म्हणून, पात्र असतील.

B. पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदासाठी वयोमर्यादा :
प्रवर्ग किमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
खुला 19 वर्षे28 वर्षे
मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती, वि.जा. – अ, भ.ज. ब, भ.ज.-क, भ.ज. ड. वि.मा.प्र., इ.मा.व., इ.डब्ल्यू.एस.)19 वर्षे33 वर्षे
प्रकल्पग्रस्त उमेदवार19 वर्षे45 वर्षे
भूकंपग्रस्त उमेदवार19 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक उमेदवार19 वर्षेउमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 03 वर्षे इतकी राहील.
पदवीधर
पदविकाधारक
अंशकालीन उमेदवार
19 वर्षे55 वर्षे
अनाथ19 वर्षे33 वर्षे

समांतर आरक्षणांतर्गत येणारे उमेदवार :- किमान वयोमर्यादा 19 वर्षे.

प्रवर्ग कमाल वयोमर्यादा (खुला प्रवर्ग)कमाल वयोमर्यादा (मागास प्रवर्ग)
खुला 28 वर्षे33 वर्षे
खेळाडू उमेदवार28 + 5 वर्षे33 + 5 वर्षे
पोलीस पाल्य28 वर्षे33 वर्षे
गृहरक्षक28 वर्षे33 वर्षे
माजी सैनिकावर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) उमदेवार28 + 3 वर्षे33 + 3 वर्षे
C. राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी वयोमर्यादा:
प्रवर्ग किमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
खुला 18 वर्षे25 वर्षे
मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती, वि.जा. – अ, भ.ज. ब, भ.ज.-क, भ.ज. ड. वि.मा.प्र., इ.मा.व., इ.डब्ल्यू.एस.)18 वर्षे30 वर्षे
प्रकल्पग्रस्त उमेदवार18 वर्षे45 वर्षे
भूकंपग्रस्त उमेदवार18 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक उमेदवार18 वर्षेउमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 03 वर्षे इतकी राहील.
पदवीधर
पदविकाधारक
अंशकालीन उमेदवार
18 वर्षे55 वर्षे
अनाथ18 वर्षे30 वर्षे

समांतर आरक्षणांतर्गत येणारे उमेदवार :- किमान वयोमर्यादा 18 वर्षे.

प्रवर्ग कमाल वयोमर्यादा (खुला प्रवर्ग)कमाल वयोमर्यादा (मागास प्रवर्ग)
खेळाडू उमेदवार25 + 5 वर्षे30 + 5 वर्षे
पोलीस पाल्य25 वर्षे30 वर्षे
गृहरक्षक25 वर्षे30 वर्षे
माजी सैनिकावर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) उमदेवार25 + 3 वर्षे30 + 3 वर्षे

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

अ) उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• समकक्षबाबत :-

 • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (विद्यापिठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार).
 • विद्यापीठे, मानीव विद्यापीठे, ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदवीका.
 • व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने उच्च शिक्षणासाठी 02 स्तराची समकक्षता निश्चित केलेले 02 वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम.
 • डिप्लोमा इन मेकेलिकल इंजिनियरिंग.

ब) माजी सैनिक: 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणान्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा TASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र व 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

A. पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाकरीता
महिला उमेदवारांकरितापुरुष उमेदवारांकरिता
उंची155 से.मी.165 से. मी.
छातिन फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा

सूट :

• शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:

(1) उंची : 4.0 से.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.

(2) छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.

• खेळाडू उमेदवारासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणान्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 से.मी. इतकी सूट देय राहील

3) पोलीस दलातील कर्मचान्यांच्या कुटुंबियांबाबत पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किया वैद्यकीय अधिकान्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचान्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल

 1. छाती : 2 से.मी. न फुगवता व 1.5 से.मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी.
 2. उंची : 25 से.मी. पुरुष व महिला उमेदवारांसाठी.
B. पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदाकरीता
महिला उमेदवारांकरितापुरुष उमेदवारांकरिता
उंची158 से.मी.165 से. मी.
छातिन फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा
C. राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरीता.
पुरुष उमेदवारांकरिता
उंची168 से.मी
छातीन फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा.

परीक्षा शुल्क (Exam Fee)

अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता आवश्यक माहिती policerecruitment2022.mahait.org/www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर परीक्षेकरीता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील.

पदाचे नावखुला प्रवर्गमागास प्रवर्ग
पोलीस शिपाईरु. 450/-रु. 350/-
पोलीस शिपाई चालकरु. 450/-रु. 350/-
सशस्त्र पोलीस शिपाईरु. 450/-रु. 350/-

शारिरीक चाचणी (Physical Test)

1). पोलीस शिपाई पदाकरीता :-

• पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.

पुरुष उमेदवारगुण
1600 मीटर धावणे20
100 मीटर धावणे15
गोळाफेक15
एकूण50
महिला उमेदवारगुण
800 मीटर धावणे20
100 मीटर धावणे15
गोळाफेक15
एकूण50
2) पोलीस शिपाई चालक पदाकरीता :
पुरुष उमेदवारगुण
1600 मीटर धावणे30
गोळाफेक20
एकूण50
महिला उमेदवारगुण
800 मीटर धावणे30
गोळाफेक20
एकूण50
3) सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरीता :-

• सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.

पुरुष उमेदवारगुण
5 कि.मी. धावणे50
100 मीटर धावणे25
गोळाफेक25
एकूण100
पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :

(1) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण कावे लागेल.

(2) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :

हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी25 गुण
जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी25 गुण

(3) कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

(4) वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष महासंचालकांकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील.

(5) वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरीता समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकान्यांचा समावेश असेल.

लेखी चाचणीचे स्वरुप (Written Test Pattern

1) पोलीस शिपाई पदाकरीता :-

• शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.

• उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

• लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांच्या घटकावरील भरती प्रक्रिया वगळता सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

• लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:

 1. अंकगणित
 2. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी;
 3. बुध्दीमत्ता चाचणी;
 4. मराठी व्याकरण
2) पोलीस शिपाई चालक पदाकरीता :

• शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.

• लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी

• हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी (25 गुण) व (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी (25 गुण) अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

• कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

• कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलविण्यांत येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांच्या घटकावरील भरती प्रक्रिया वगळता सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

• लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :-

 1. अंकगणित
 2. सामान्यज्ञान व चालू घडामोडी
 3. बुध्दीमत्ता चाचणी
 4. मराठी व्याकरण आणि
 5. मोटार वाहन चालविणे वाहतुकीबाबतचे नियम
3) सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरीता :-

• शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधीलजाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.

• उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

• लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. राज्य राखीव पोलीस दलातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात येईल.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :-

 1. अंकगणित
 2. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी;
 3. बुध्दीमत्ता चाचणी
 4. मराठी व्याकरण

टीप :- वरील नमूद तिन्ही पदाकरिता शारिरीक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रीत गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल, त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार अंतिम निवडयादी / प्रतीक्षायादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करुन प्रसिद्ध करण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अधिसूचना (Notification) प्रसिद्ध9 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात9 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.mahapolice.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Here
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 प्रवेशपत्रयेथे डाऊनलोड करा
Maharashtra Police Bharti 2022 Admit Cardयेथे डाऊनलोड करा

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज (Maharashtra state police recruitment 2022 online application) कसा सादर करावा?

• नोंदणी (Registration) :- नोंदणीसाठी पुढे जाण्यासाठी नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा नंतर फॉर्ममध्ये नमूद केलेली सर्व अनिवार्य फील्ड भरा आणि तुम्हाला रीसेट करायचे असल्यास रजिस्टरवर क्लिक करा आणि रीसेट टॅबवर क्लिक करा.

• लॉग इन करण्यासाठी येथे सर्व आवश्यक क्रेडिएन्शिअल भरा.

• लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

• पद व घटक निवडा. (उमेदवार सर्व तीन पदांसाठी एकाच नोंदणी द्वारे अर्ज करू शकतो)

• प्रोफाइल विभाग भरा. (समांतर आरक्षणे निर्दिष्ट केलेली आहेत उमेदवार त्यापैकी फक्त एक समांतर आरक्षण घेऊ शकतो)

• जात व तारीख टाका.

• आपला संपर्क तपशील भरा.

• इतर तपशील भरा.

• शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा.

पासवर्ड बदला वर क्लिक करा आणि नंतर ते लॉगिन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल आणि तेथे संकेतशब्दे बदला आणि लॉग इन करा.

• अर्ज करा वर क्लिक करा नंतर फोटो व स्वाक्षरी अपलोड करा आणि निवडलेल्या पोस्टसाठी शुल्क भरा.

FAQs

Q1. महाराष्ट्र पोलीस भरतीचा 2022 ऑनलाईन अर्ज भरण्यास केव्हा सुरुवात होईल? (When does start online application for Maharashtra Police Bharti 2022?)

A. 9 नोव्हेंबर 2022 पासून पुढे.

Q2. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of online apply for Maharashtra Police constable recruitment 2022?)

A.15 डिसेंबर 2022 पर्यंत.

Q3. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 किती जागांसाठी जाहीर झाली आहे? (How many vacancies released under Maharashtra Police constable Bharti 2022)

Q4. 18331 पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.

WWW.MPSCRESULT.COM

Leave a Comment