ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 | TMC Thane Nurse Bharti 2022 :- ठाणे महानगरपालिकेने ‘परिचारिका’ या पदाच्या 49 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील रिक्त पदांकरीता जाहिरात 06 महिन्याच्या (179) दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) उपस्थित रहावे.
उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय करिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात 06 महिने कालावधीकरीता खालील नमूद केलेली पद भरावयाची असल्याने त्यांचे पदनाम, पदसंख्या व शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे.
Table of Contents
- ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 संक्षिप्त तपशील | TMC Thane Nurse Bharti 2022 Overview
- ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 अधिसूचना (TMC Thane Nurse Bharti 2022 Notification)
- पदांचा तपशील (Vacancy Details)
- शैक्षणिक पात्रता व अनुभव (Educational Qualification and Experience)
- मानधन (प्रति महिना)
- उच्च वयोमर्यादा (Upper Agelimit)
- अर्जाचे शुल्क (Application Fee)
- मुलाखतीचे ठिकाण (Interview Venue)
- मुलाखतीची तारीख वेळ (Interview Date and Time)इतर जाहिराती
- इतर जाहिराती
ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 संक्षिप्त तपशील | TMC Thane Nurse Bharti 2022 Overview
भरती मंडळ | ठाणे महानगरपालिका |
पदाचे नाव | परिचारिका (Nurse) |
एकूण पदे | 49 |
निवड पद्धत | मुलाखतीद्वारे |
निवडीचा कालावधी | 06 महिने |
मुलाखतीची तारीख | 24 नोव्हेंबर 2022 |
अधिकृत वेबसाईट | www.thanecity.gov.in |
ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 अधिसूचना (TMC Thane Nurse Bharti 2022 Notification)
ठाणे महानगरपालिकेने त्यांच्या www.thanecity.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परिचारिका (Nurse) या पदाच्या एकूण 49 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.
ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 अधिसूचना (TMC Thane Nurse Bharti 2022 Notification)
पदांचा तपशील (Vacancy Details)
पदाचे नाव | अनुसूचीत जाती (SC) | अनुसूचीत जमाती (ST) | विमूक्त जाती (अ) | भटक्या जमाती (ब) | भटक्या जमाती (क) | भटक्या जमाती (ड) | विशेष मागास प्रवर्ग | इतर मागास प्रवर्ग | EWS | खुला | एकूण |
परिचारिका | 06 | 03 | 02 | 01 | 02 | 01 | 01 | 09 | 05 | 19 | 49 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव (Educational Qualification and Experience)
1. महाराष्ट्र राज्य माधमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परिक्षा 12वी (HSC) उत्तीर्ण.
2. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (G. N. M.) ही पदविका असणे आवश्यक.
बी.एस्सी. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य.
3. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
4. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ परिचारीका/ स्टाफ नर्स या कामाचा 03 वर्षांचा अनुभव.
ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवायफरी किंवा बी.एस्सी (नर्सिंग) पुर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य.
5. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण इ याचे प्रमाणपत्र इ.
6. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
मानधन (प्रति महिना)
• ₹ 30,000/-
उच्च वयोमर्यादा (Upper Agelimit)
श्रेणी | उच्च वयोमर्यादा |
खुला प्रवर्ग | 38 वर्षे |
मागासवर्गिय | 43 वर्षे |
अर्जाचे शुल्क (Application Fee)
• अर्जाचे शुल्क (Application Fee) :- नाही
मुलाखतीचे ठिकाण (Interview Venue)
“कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी”
मुलाखतीची तारीख वेळ (Interview Date and Time)इतर जाहिराती
• दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11: 00 वाजता
इतर जाहिराती
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2022 | NHM Nashik Bharti 2022
NHM Thane Bharti 2022: 280 रिक्त जागांसाठी भरती जाहीर
Pune Mahanagarpalika Bharti 2022 : विविध पदांच्या 229 रिक्त जागांसाठी भरती