मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स भरती 2022 | BMC Staff Nurse Bharti 2022

मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स भरती 2022 | BMC Staff Nurse Bharti 2022 : 2 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमुन्यात (Offline) अर्ज करा.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई – 22. येथे अधिपरिचारीका यांची फक्त 06 महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचे शुल्क रुपये 354 /- रोखीत रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला, रुम नं 15, शीव, मुंबई – 400022 येथे भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकीत छायांकीत प्रतीसह व अर्जाचे शुल्क भरल्याच्या पावतीसह शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत परिचारिका आस्थापना कक्षात दि 23.11.2022 ते दि 02.12.2022 पर्यंत स्विकारले जातील. दि 02.12.2022 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबतीतील कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार स्विकारला जाणार नाही.

Table of Contents

मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स भरती 2022 संक्षिप्त तपशील (BMC Staff Nurse Bharti 2022 Overview)

भरती मंडळमुंबई महानगरपालिका (BMC)
Job CategoryState Govt Jobs
पदाचे नावपरिचारिका (Nurse)
एकूण जागा118
अर्ज करण्याची पद्धतविहित नमुन्यात (Offline)
अर्ज करण्यास सुरुवात23 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख2 डिसेंबर 2022
मुलाखतीची तारीख व वेळमुलाखती दि. 13.12.2022 व 14.12.2022 रोजी सकाळी 11 वा. ते दु 3 वाजेपर्यंत घेतल्या जातील
अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in

अधिसूचना (Notification)

मुंबई महानगरपालिकेने (BMC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट परिचारिका (Nurse) या पदाच्या एकूण 118 रिक्त जागांसाठी अधिसूचना (Notification) 21 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

BMC Staff Nurse Bharti 2022 अधिसूचनेची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महानगरपालिका परिचारिका रिक्त जागा (Staff Nurse Vacancy in BMC Mumbai)

पदाचे नावरिक्त पदे
प्रशिक्षित अधिपरिचारिका (कंत्राटी तत्वावर ) (Staff Nurse) 06 महिन्याकरीता118

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज करण्यास सुरुवात23 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख2 डिसेंबर 2022
मुलाखतीची तारीख13 – 14 डिसेंबर 2022

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

• उमेदवार 12वी पास व कमीत कमी परिचरिका (Nurse) पदासाठी आवश्यक असलेली GNM ही पदवी धारण केलेली असावी. तरी उच्च गुणवत्ता धारक उमेदवार अर्ज करु शकतात

• उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

वयोमर्यादा (Agelimit)

प्रवर्गकिमान वयकमाल वय
खुला1838
मागासवर्ग1843

वेतन (Salary)

• ₹30,000/- प्रति महिना

अर्जाचे शुल्क (Application Fee)

• अर्जाचे शुल्क :- ₹251+18% GST = ₹354/-

महत्वाच्या सूचना (Important Instructions)

• अर्जाचे विहित मुल्य भरुन त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.

• टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

• मुलाखतीच्या वेळी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे Cancelled Cheque पासबुकाची छायांकीत प्रत आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतिसह साक्षांकित छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे व साक्षांकीत प्रती अर्जासोबत जोडाव्या.

• उमेदवारास पूर्वानुभव असल्यास त्याच्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतिसह साक्षांकित छायांकित प्रतीसह मुलाखतीस उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण (Interview Venue)

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई – 22.

मुलाखतीची तारीख व वेळ (Interview Date & Time)

• मुलाखती दि. 13.12.2022 व 14.12.2022 रोजी सकाळी 11 वा. ते दु 3 वाजेपर्यंत घेतल्या जातील.

अर्ज कसा करावा? (How to apply?)

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रति व अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिकटवुन विहित नमुन्यातील सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज लोटिमस रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्षात शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील. दि 02.12.2022 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबतीतील कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार स्विकारला जाणार नाही.

Leave a Comment