PCMC शिक्षक भरती 2022 | PCMC Teacher Recruitment 2022

PCMC शिक्षक भरती 2022 | PCMC Teacher Recruitment 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर गट ‘क’ संवर्गातील “सहाय्यक शिक्षक”“पदवीधर शिक्षक” हि एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या लेखात आम्ही या भरती संबंधित सर्व तपशील नमूद केलेला आहे उमेदवारांनी तो तपासावा.

Table of Contents

PCMC शिक्षक भरती 2022 संक्षिप्त तपशील (PCMC Teacher Recruitment 2022 overview)

भरती मंडळपिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
नोकरीची श्रेणी (Job category)State Govt Jobs
पदाचे नावसहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक
एकूण पदे285
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज सादर करण्याची तारीख8-9 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.pcmcindia.gov.in

PCMC शिक्षक भरती 2022 अधिसूचना (PCMC Teacher Recruitment 2022 Notification)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर गट ‘क’ संवर्गातील “सहाय्यक शिक्षक”“पदवीधर शिक्षक” भरतीची अधिसूचना 23 नोव्हेंबर 2022 रोजी www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF व अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकतात.

PCMC शिक्षक भरती 2022 अधिसूचना व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जागांचा तपशील (Vacancy Details)

पिपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2022-2023 केवळ या कालावधीसाठी हिंदी, इंग्रजी व उर्दू या माध्यमाच्या शाळांमध्ये एकत्रित मानधन तत्वावर 06 महिने कालावधीसाठी उन्हाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खाली तक्त्यात नमूद करण्यात आला आहे.

(1) मराठी माध्यम – 204 पदे

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक)110
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)85
पदवीधर शिक्षक (भाषा विषय)09
एकूण204

(2‌‌) उर्दू माध्यम – 46 पदे

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक)18
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)18
पदवीधर शिक्षक (भाषा विषय)04
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय)06
एकूण46

(3) हिंदी माध्यम – 15 पदे

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक)09
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)03
पदवीधर शिक्षक (भाषा विषय)01
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय)02
एकूण15

(4) इंग्रजी माध्यम – 20 पदे

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक)10
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)04
पदवीधर शिक्षक (भाषा विषय)04
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय)02
एकूण20

शै‌क्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक)12वी (HSC) व D.Ed
पदवीधर शिक्षक (विज्ञान/भाषा/सामाजशास्त्र विषय)12वी (HSC) व D.Ed, B.A – B.Ed (विज्ञान/भाषा/सामाजशास्त्र विषय)

वेतन (Salary)

• वरील सर्व पदांसाठी प्रति महिना एकत्रित मानधन 20,000/- रुपये असेल.

अर्ज कसा करावा? (How to apply?)

• अर्जदाराने आपले अर्ज महापालिकेच्या जाहीरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे बंधनकारक राहील. अन्यथा अर्ज बाद केले जातील.

• उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक व व्यवसायीक अर्हताविषयक प्रमाणपत्र, पदवीका, डी.एड., बी.एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र, तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.

• उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात सहा. शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज मा. अति.आयुक्त (१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज दि. 08 डिसेंबर 2022 ते 09 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यत समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव, येथे वेळेत सादर करावा.

• नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रूपये 100/- स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड करून) मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

अर्ज पाठविण्याची पत्ता (Address to send application)

जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव

अधिकृत वेबसाईटwww.pcmcindia.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
अर्जाचा नमूनायेथे डाऊनलोड करा

FAQs

Q1. PCMC शिक्षक भरती 2022 कोणकोणत्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे?

A. सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Q2. PCMC शिक्षक भरती 2022 एकूण किती जागांसाठी भरती जाहीर केली आहे?

A. सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदांच्या एकूण 285 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

Q3. PCMC शिक्षक भरती 2022 चा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

A. 08 डिसेंबर 2022 ते 09 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 05.00

Q4. PCMC शिक्षक भरती 2022 चा अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता आहे?

A. जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव.

Leave a Comment