नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 | NLC India Ltd Recruitment 2022
NLC India Limited (NLCIL) ही ‘नवरत्न’ सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. खाणकाम (लिग्नाइट आणि कोळसा), औष्णिक ऊर्जा निर्मिती आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रांमध्ये कंपनी कार्यरत आहे. कंपनी नेवेली (तामिळनाडू), बारसिंगसर प्रकल्प (राजस्थान) आणि तालाबिरा-II आणि III OCP प्रकल्प (ओडिशा). येथे असलेल्या तिच्या लिग्नाइट/कोळसा खाणींसाठी जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी), जूनियर सर्वेअर (ट्रेनी) व सिरदार या खाण वैधानिक पदांच्या एकूण 213 रिक्त जागांसाठी 16 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Table of Contents
- नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 संक्षिप्त तपशील (NLC India Ltd Recruitment 2022 Overview)
- नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अधिसूचना (NLC India Ltd Recruitment 2022 Notification)
- नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज (NLC India Ltd Recruitment 2022 Online Appply)
- महत्वाच्या तारखा (Important Dates)
- पदांचा तपशील (Vacancy Details)
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- वयोमर्यादा (Agelimit)
- वेतन (Salary)
- निवडप्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online?)
- अर्जाचे शुल्क (Application Fee)
- महत्वाच्या लिंक्स (Important Links)
- FAQs
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 संक्षिप्त तपशील (NLC India Ltd Recruitment 2022 Overview)
भरती मंडळ | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) |
नोकरीची श्रेणी (job category) | All India Govt Jobs |
पदाचे नाव | जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी), जूनियर सर्वेअर (ट्रेनी) व सिरदार |
एकूण जागा | 213 |
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात | 2 डिसेंबर 2022 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 जानेवारी 2023 |
निवड पद्धत | लेखी परीक्षा |
अधिकृत वेबसाईट | www.nlcindia.in |
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 अधिसूचना (NLC India Ltd Recruitment 2022 Notification)
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडने (NLC) ने 1 डिसेंबर 2022 रोजी जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी), जूनियर सर्वेअर (ट्रेनी) व सिरदार या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 ऑनलाईन अर्ज (NLC India Ltd Recruitment 2022 Online Appply)
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी), जूनियर सर्वेअर (ट्रेनी) व सिरदार या पदांच्या भरतीसाठीचा ऑनलाईन अर्ज करण्यास 2 डिसेंबर 2022 सुरुवात झाली आहे तर 16 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करु शकतात.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अधिसूचना प्रसिद्ध | 1 डिसेंबर 2022 |
ऑनलाईन नोंदणीस सुरुवात | 2 डिसेंबर 2022 |
ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख | 16 जानेवारी 2023 |
ज्या उमेदवारांनी आधीच नोंदणी केली आहे आणि वेळेच्या मर्यादेत शुल्क भरले आहे त्यांच्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – तारीख आणि वेळ | 17 जानेवारी 2023 |
पदांचा तपशील (Vacancy Details)
पदाचे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | एकूण |
जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी) | 27 | 04 | 12 | 08 | 00 | 51 |
जूनियर सर्वेअर (ट्रेनी) | 09 | 01 | 03 | 02 | 00 | 15 |
सिरदार | 67 | 14 | 37 | 27 | 02 | 147 |
एकूण | 103 | 19 | 52 | 37 | 02 | 213 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी) | i) डिप्लोमा (Mining/Mining Engineering) ii) वैध ओव्हरमॅन प्रमाणपत्र iii) वैध प्राथमिक उपचार (First Aid) प्रमाणपत्र |
जूनियर सर्वेअर (ट्रेनी) | i) डिप्लोमा (Mining/Mining Engineering/Mine Surveying/Diploma or Degree in Civil Engineering/National Trade Certificate (NTC) in Surveying) ii) सर्वेअर प्रमाणपत्र |
सिरदार | i) डिप्लोमा किंवा पदवी (Mining/Mining Engineering) ii) सिरदार प्रमाणपत्र iii) वैध प्राथमिक उपचार (First Aid) प्रमाणपत्र किंवा i) डिप्लोमा किंवा पदवी (Mining With Overman) |
वयोमर्यादा (Agelimit)
• 1 डिसेंबर 2022 रोजी चे कमाल वय खालील प्रमाणे असावे.
पदाचे नाव | UR/EWS | OBC | SC | ST |
जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी)/जूनियर सर्वेअर (ट्रेनी)/सिरदार | 30 | 33 | 35 | 35 |
वेतन (Salary)
पदाचे नाव | वेतन |
जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी)/जूनियर सर्वेअर (ट्रेनी) | 31000 – 100000 S1 Grade |
सिरदार | 26000 – 3% – 110000 SG1 Grade |
निवडप्रक्रिया (Selection Process)
• जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी)/जूनियर सर्वेअर (ट्रेनी)/सिरदार या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होईल. लेखी परीक्षेचे स्वरूप खाली नमूद करण्यात आले आहे.
• लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील ज्यात प्रत्येकाला समान गुण असतील, चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण (Negative Marking) नसतील.
• परीक्षेचा कालावधी :- 120 मिनीटे
भाग | विषय | प्रश्न संख्या | गुण |
भाग I | परिमाणात्मक योग्यता (Quantitative Aptitude), तर्कशक्ती (Reasoning) आणि सामान्य जागरूकता (General Awareness)(डिप्लोमा स्तर) | 30 | 30 |
भाग II | संबंधित विषयातील ज्ञान | 70 | 70 |
ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply Online?)
• उमेदवारांनी NLC इंडिया लिमिटेडच्या www.nlcindia.in वेबसाइटवर फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
• उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती विहित नमुन्यात अपलोड कराव्या लागतील.
• एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी स्वतंत्र नोंदणी-सह-अर्ज फॉर्म आणि प्रत्येक पदासाठी आवश्यक कागदपत्रांसह शुल्काची पावती सबमिट करावी.
• आवश्यक अर्जाचे शुल्क भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑनलाइनद्वारे सबमिट करावा, उमेदवारांनी नोंदणीसह अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी आणि कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्रे/कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह सादर करावे.
अर्जाचे शुल्क (Application Fee)
पदाचे नाव | UR/EWS/OBC | SC/ST/PwBD/ESM |
जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी)/जूनियर सर्वेअर (ट्रेनी) | ₹595/- | ₹295/- |
सिरदार | ₹486/- | ₹236/- |
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाईट | www.nlcindia.in |
अधिसूचना (Notification) | येथे डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | Apply Here |
FAQs
प्रश्न 1. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 एकूण किती जागांसाठी भरती जाहीर केली आहे? (How many vacancies announced underNLC India Ltd Recruitment 2022?)
उत्तर. जूनियर ओव्हरमॅन (ट्रेनी)/जूनियर सर्वेअर (ट्रेनी)/सिरदार या पदांच्या एकूण 213 जागांसाठी ही भरती होत आहे.
प्रश्न 2. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केव्हा होणार आहे आहे? (When will start apply online for NLC India Ltd Recruitment 2022?)
उत्तर. 2 डिसेंबर 2022 पासून पुढे.
प्रश्न 3. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of applying online for NLC India Ltd Recruitment 2022?)
उत्तर. 16 जानेवारी 2023 पर्यंत.
प्रश्न 4. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 चा ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट कोणती आहे? (What is the official website of applying online for NLC India Ltd Recruitment 2022?)
उत्तर. www.nlcindia.in