मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2022 | BMC Fireman Bharti 2022

मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2022 | BMC Fireman Bharti 2022 :- फायरमन या पदाच्या एकूण 910 पदांसाठी भरती जाहीर.

मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2022 फायरमन (Fireman) या पदाच्या एकूण 910 रिक्त जागांसाठीची अधिसूचना 29 डिसेंबर 2022 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड सरळसेवेने (Walk in Selection) या तत्त्वावर होईल. उमेदवारांनी खाली या लेखात सारणीबद्ध केल्याप्रमाणे 13-01-2023 ते 04-02-2023 या तारखांदरम्यान लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे.बी.सी.एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई-400103 हजर राहणे आवश्यक आहे.

Table of Contents

मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2022 संक्षिप्त तपशील (BMC Fireman Bharti 2022 overview)

भरती मंडळबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावफायरमन
एकूण जागा910
निवड पद्धतI) मैदानी चाचणी
II) प्रमाणपत्र चाचणी (व्यवसायिक चाचणी)
भरतीच्या तारखा13-01-2023 ते 04-02-2023
अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in

मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2022 अधिसूचना (BMC Fireman Recruitment 2022 Notification)

मुंबई महानगरपालिकेने (BMC) फायरमन या पदाच्या एकूण 910 रिक्त जागांसाठी अधिसूचना 29 डिसेंबर 2022 रोजी www.mcgm.go.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF व अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकतात.

मुंबई महानगरपालिका फायरमन भरती 2022 अधिसूचना (BMC Fireman Recruitment 2022 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील (Vacancy Details)

एकूण पदेअजाअजविज
(अ)
भज
(ब)
भज
(क)
भज
(ड)
विमाप्रइमावआदुघखुला
9109926181422160817391443

• अनाथ – 09 पदे

• दिव्यांग :- 37 पदे

पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

1.• सर्वसाधारण उमेदवारांसाठी:- उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील इयत्ता 12 वी कमान 50 टके गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
• माजी सैनिकांसाठी – उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील इयत्ता 12 वी कमान 50 टके गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. .
किंवा
उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावे.
2.उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम कंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3.DOEACE सोसायटीचे ‘CCC’ प्रमाणपत्र किंवा MSCIT प्रमाणपत्र असावे. अर्ज सादर करताना सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नसल्यास निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षांच्या आत शासनाने विहितहत केलेले ‘MSCIT’ ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.

• जड वाहन चालवण्याचा वैध परवाना असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वैद्यकीय दर्जा (Medical Standard)

उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असावा. सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा.

किमान शारीरिक दर्जा (Physical Standard)

उमेदवाराकडे खालील नमूद केलेला किमान शारीरिक दर्जा असणे आवश्यक आहे.

उंची किमान – 172 से.मी. (पुरुषांसाठी)
उंची किमान – 162 से.मी. (महिलांसाठी)
छाती (फक्त पुरुष उमेदवारांसाठी)81 से.मी. (साधारण) , 86 से.मी. (फुगवून)
वजनकिमान – 50 कि. ग्रॅ.
दृष्टीचष्मा किंवा तत्सम साधनांशिवाय (साधारण), वर्णान्धता: आजारापासून मुक्त असावा

वयोमर्यादा (Agelimit)

• उमेदवाराचे किमान व कमाल वय 31 डिसेंबर 2022 रोजी खालील प्रमाणे असावे :-

श्रेणीकिमान वयकमाल वय
सर्वसाधारण (UR)20 वर्षे27 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार, युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनावर अवलंबून असलेले उमेदवार, माजी सैनिक व महानगरपालिका कर्मचारी, खेळाडू, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ20 वर्षे27 वर्षे
माजी सैनिकसेवेचा कालावधी + 3 वर्षे

उमेदवारांनी भरतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण

लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे.बी.सी.एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई-400103

उमेदवाराने टक्केवारीनुसार भरतीसाठी हजर राहण्याचे वेळापत्रक

अ. क्र.जात प्रवर्गसमांतर आरक्षण/अनाथ आरक्षण12 वी परीक्षेची गुणांची टक्केवारीवैयक्तिक माहितीपत्रक भरून, डिमांड ड्राफ्ट व मूळप्रमाणपत्रांसह भरतीसाठी हजर रहावयाचे दिनांक व वेळ
1.विमाप्र(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 13-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
2.भज (ब)(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 14-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
3.भज (क)(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 16-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
4.भज (ड)(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 17-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
5.अ.जा.(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)60% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 18-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
6.अ.जा.(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% ते 59.99% गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 19-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
7.अ.ज.(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 20-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
8.आदुघ(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 21-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
9.इमाव(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)65% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 23-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
10.इमाव(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)55% ते 64.99 % गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 24-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
11.इमाव(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% ते 54.99 % गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 27-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
12.माजी सैनिक/ अनाथअजा, अज, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव, आदुघ, खुला50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवार
किंवा
उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र.
दि. 28-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
13.खुला(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)70% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 30-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
14.खुला(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)60% ते 69.99% गुण प्राप्त केलेले उमेदवारदि.31-01-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
15.खुला(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)55% ते 59.99% गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 01-02-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
16.खुला(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% ते 54.99% गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 02-02-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
17.विजा अ(समांतर आरक्षणातील खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व सर्वसाधारण उमेदवारांसहित)50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 03-02-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.
18.महिलाअजा, अज, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव, आदुघ, खुला50% व अधिक टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवारदि. 04-02-2023 सकाळी 08.00 वाजेपर्यंत.

निवडीचे निकष व कार्यपद्धत

i) इयत्ता 12 वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

ii) भरती प्रक्रियेतील मैदानी व प्रमाणपत्र चाचणी (व्यवसायिक चाचणी) यामध्ये प्राप्त झालेले गुण अशा एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार सामािजक/समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड/गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि, दोन कंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास जन्मदिनांकानुसार वयो जेष्ठतेने प्राधान्यक्रम देयात येईल व जन्म दिनांक समान असल्यास उमेदवाराच्या नावाचे अद्याक्षर (इंग्रजी) याप्रमाणे प्राधान्यक्रम देयात येईल.

iii) उच्च गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांची खुल्या पदांवर नेमणूक करण्यात येईल.

iv) निवड झालेल्या उमेदवारांमधून रिक्त असलेल्या पदांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शैल्य चिकित्सक यांच्याकडे वैदयकीय तपासणीस पाठविण्यात येईल. वैदयकीय तपासणीत पात्र झालेल्या उमेदवारां अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर, मुंबई अग्निशमन दलाच्या पाठयक्रमानुसार 6 महिन्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या नियमावलीनुसार देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान अग्निशामक उमेदवारास दरमहा रु. 3000/- (रुपये तीन हजार फक्त) इतके पाठयवेतन देण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल.

v) प्रशिक्षण कालावधीमध्ये 03 चाचणी परिक्षा व अंतिम मैदानी व लेखी परिक्षा घेण्यात येईल. एकत्रित सर्व परिक्षा मिळून सरासरी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण झाल्यास शेवटची संधी म्हणून प्रशिक्षण कालावधी 03 महिन्यांपर्यंत वाढविण्यात येईल व वाढीव प्रशिक्षण कालावधीत घेण्यात येणा-या 01 चाचणी व अंतिम लेखी व मैदानी परिक्षेत एकत्रित 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल व पुन्हा संधी दिली जाणार नाही. प्रशिक्षण वाढविण्यात आलेल्या उमेदवाराला त्याच्या वाढीव प्रशिक्षण कालावधीत कोणतेही पाठयवेतन देण्यात येणार नाही व त्यांना वाढीव प्रशिक्षण विनापाठयवंतन करावे लागेल.

vi) भरतीच्या निवडीच्या वेळची गुणवत्ता / निवड यादीत प्राप्त केलेले गुण 50 टक्के व प्रशिक्षण कालावधीत प्राप्त केलेले गुण 50 टक्के (गुणांची बेरीज करून) यासह सेवाज्येष्ठता तयार करून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच त्यांचे आरक्षण भरतीच्या गुणवत्ता यादीतील आरक्षणानुसारच राहील.

vii) अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रीयेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण (म्हणजेच 120 गुणांपैकी किमान 60 गुण) प्राप्त करणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत 50 टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीसाठी अपात्र होतील.

व्यवसायिक चाचणीचे स्वरूप

• उमेदवारांना निवडीच्या वेळी खालीप्रमाणे व्यावसायिक चाचणी दयावी लागेल.

• पुरुष / महिला उमेदवारांची 200 गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

मैदानी चाचणी120 गुण
प्रमाणपत्र चाचणी80 गुण
एकूण200 गुण

शारीरिक पात्रता

पुरुषमहिला
अ) उंची किमान 172 सें.मी.
आ) छाती 81 सें.मी. (न फुगवता) व 86 सें.मी. (फुगवून)
इ) वजन किमान 50 कि.ग्रॅम
अ) उंची किमान 162 सें.मी.
आ) वजन किमान 50 कि.ग्रॅम

मैदानी चाचणीचे स्वरूप (पुरुषांसाठी)

अ) 3 मिनीटांमध्ये 800 मीटर्स अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील.

ब) 19 फुट उंचीवरुन जंपिंग शिटमध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र होतील.

क) जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकी लावलेल्या (46.4′ वरील उचीच्या) ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल.

• (आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल.) (40 गुण)

वेळ (सेकंदांमध्ये)गुण
20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी40 गुण
20.1 सेकंद ते 30 सेकंदांपर्यंत25 गुण
30.1 सेकंद ते 40 सेकंदांपर्यंत10 गुण
40 सेकंदापेक्षा जास्त0 गुण

• 50 कि.ग्रॅम वजनाची मानवाकृती खांदयावर घेऊन दिलेल्या मार्गाने 50 मीटर अंतर धावणे. (40 गुण)

वेळ (सेकंदांमध्ये)गुण
20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी40 गुण
20.1 सेकंद ते 30 सेकंदांपर्यंत20 गुण
30.1 सेकंद ते 40 सेकंदांपर्यंत10 गुण
40 सेकंदापेक्षा जास्त0 गुण

• 20 फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे (रस्सीवर चढलेवेळी फक्त हाताचा वापर करणे बंधनकारक राहील. पायाचा वापर करता येणार नाही केल्यास शून्य गुण मिळेल)

मापदंडगुण
रस्सी पुर्ण चढल्यास30 गुण
¾ चढल्यास20 गुण
½ चढल्यास10 गुण
अर्ध्यापेक्षा कमी अंतर चढल्यास0 गुण

• 20 पुलअप्स काढणे. (10 गुण)

(प्रत्येक पुल-अप्सला अर्धा गुण याप्रमाणे 20 पुल अप्स पूर्ण केल्यास 10 गुण देण्यात येतील.)

मैदानी चाचणीचे स्वरूप (महिलांसाठी)

अ) 4 मिनीटांमध्ये 800 मीटर्स अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील.

ब) 19 फुट उंचीवरुन जंपिंग शिटमध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र होतील.

क) जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकी लावलेल्या (46.4′ वरील उचीच्या) ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल.

• (आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल.) (40 गुण)

वेळ (सेकंदांमध्ये)गुण
30 सेकंद किंवा 30 सेकंदापेक्षा कमी40 गुण
30.1 सेकंद ते 40 सेकंदांपर्यंत30 गुण
40.1 सेकंद ते 50 सेकंदांपर्यंत20 गुण
50.1 सेकंद ते 60 सेकंदांपर्यंत10 गुण
60 सेकंदांपेक्षा जास्त0 गुण

ड 40 कि.ग्रॅम वजनाची मानवाकृती खांदयावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर अंतर धावणे. (40 गुण)

वेळ (सेकंदांमध्ये)गुण
25 सेकंद किंवा 25 सेकंदापेक्षा कमी40 गुण
25.1 सेकंद ते 35 सेकंदांपर्यंत20 गुण
35.1 सेकंद ते 45 सेकंदांपर्यंत10 गुण
45 सेकंदापेक्षा जास्त0 गुण

ड) गोळा फेक (4 कि. ग्रॅ) – (10 गुण)

अंतरगुण
6 मीटर व त्यापेक्षा जास्त10 गुण
5 मीटर ते 6 मीटरपेक्षा कमी07 गुण
4 मीटर से 5 मीटरपेक्षा कमी04 गुण
4 मीटर पेक्षा कमी0 गुण

इ) लांब उडी (15 गुण)

अंतरगुण
15 फूट व त्यापेक्षा जास्त15 गुण
12 फूट ते 15 फूटापेक्षा कमी10 गुण
9 फूट ते 12 फूटापेक्षा कमी05 गुण
9 फूटापेक्षा कमी0 गुण

फ) पुश अप (जोर काढणे) – (15 गुण)

• (प्रत्येक पुश-अपला एक गुण याप्रमाणे 15 पुश अप पूर्ण केल्यास 15 गुण देण्यात येतील.)

प्रमाणपत्र चाचणी (पुरुष व महिला)

अ) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर व राज्य शासनाचे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या कडील अग्निशामक, दुय्यम अधिकारी व तत्सम मान्यताप्राप्त अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारकास :- (25 गुण)

अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम10 गुण
दुय्यम अधिकारी पाठयक्रम व तत्सम प्रमाणपत्रधारकास15 गुण

ब) एन. सी. सी. चे प्रमाणपत्र (20 गुण)

‘सी’ प्रमाणपत्र 10 गुण/’ब’ प्रमाणपत्र 06 गुण/’अ’ प्रमाणपत्र 04 गुण किंवा शालेय पातळीवरील M.C.C. प्रमाणपत्र

क) i) अर्ज सादर करण्याच्या दिनांकाला हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना (Light Motor Vehicle Licence) असल्यास- (05 गुण)

ii) अर्ज सादर करण्याच्या दिनांकाला जडवाहन चालक वैध परवाना असल्यास- (05 गुण)

ड) 1) नागरी सेवादलाच्या अग्निशमन अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र (06 गुण)

2) होमगार्डमध्ये कमीत कमी 03 वर्षे सेवा केल्याचे प्रमाणपत्र (04 गुण)

इ) सरकारी / निमसरकारी संस्था यांच्याकडे समुद्रकिना-यावर जीवरक्षक म्हणून 01 वर्षे सेवा केलेली

असल्यास किंवा मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी जीवरक्षक म्हणून किमान सहा महिने सेवा असल्यास- (15 गुण)

वेतन (Salary)

प्रशिक्षणादरम्यानचे पाठ्यवेतनरु. 3000/- प्रति महिना
प्रशिक्षणानंतरचे वेतनरु. 21700 – 691000/- प्रति महिना

भरती प्रक्रिया शुल्क

खुला / अराखीव प्रवर्ग- रु. 944/- आणि मागासवर्गीय व आदुघ / अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार रु.500/- इतके भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in
अधिसूचना व अर्जाचा नमुनायेथे डाऊनलोड करा

Leave a Comment