मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 | BMC Assistant Nurse Bharti 2023

मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 | BMC Assistant Nurse Bharti 2023

मुंबई महानगरपालिका मार्फत मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 (BMC Assistant Nurse Bharti 2023) अंतर्गत सहाय्यक परिचारिका (Assistant Nurse) या पदाच्या एकूण 421 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार 16 – 25 जानेवारी 2023 यादरम्यान ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 संक्षिप्त तपशील (BMC Assistant Nurse Bharti 2023 Overview)

भरती मंडळमुंबई महानगरपालिका (BMC)
नोकरीची श्रेणी State Govt Jobs/Nursing Job
पदाचे नावसहाय्यक परिचारिका (प्रसविका)(Assistant Nurse)
एकूण जागा421
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2023
निवडपद्धतसहाय्यक परिचारिका अभ्यासक्रमात मिळालेले गुण
अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in

मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 अधिसूचना (BMC Assistant Nurse Bharti 2023 Notification)

मुंबई महानगरपालिका मार्फत मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 (BMC Assistant Nurse Bharti 2023) अंतर्गत सहाय्यक परिचारिका (Assistant Nurse) या पदाच्या एकूण 421 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 अधिसूचना (BMC Assistant Nurse Bharti 2023 Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महापालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 रिक्त जागा (BMC Assistant Nurse Bharti 2023 Vacancy)

पदाचे नावरिक्त जागा
सहाय्यक परिचारिका421

श्रेणी नुसार पदांचा तपशील

कप्पीकृत आरक्षणअजाअजविजा (अ)भज (अ)भज (ब)भज (क)विमाप्रइमावआदुघखुलाएकूण
सर्वसाधारण310303050102035327142270
खेळाडू 5%0304021120
प्रकल्पग्रस्त 5%0304021120
भूकंपग्रस्त 2% 0102010408
माजी सैनिक 15%0801010113063363
पदवीधर/ पदवीधारक अंशकालीन 10%050108042240
एकूण510304070102048442223421

मुंबई महापालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 पात्रता निकष (BMC Assistant Nurse Bharti 2023 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक परिचारिकाi) 10 वी उत्तीर्ण
iI) सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम पूर्ण
iii) MSCIT /CCC

वयोमर्यादा (Agelimit)

• 16 जानेवारी 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे.

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला18 वर्षे38 वर्षे
मागास प्रवर्ग18 वर्षे43 वर्षे
PwBD/माजी सैनिक45 वर्षे

निवड प्रक्रिया(Selection Process)

• सर्वदृष्टीने परिपूर्ण कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर केलेल्या, अर्हताप्राप्त उमेदवारांमधून स्टेट नर्सिंग कौन्सिलने विहीत केलेल्या सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रमातील दोन्ही वर्षातील अंतिम टक्केवारीच्या सरासरीनुसार उमेदवारांची निवडयादी तयार करण्यात येईल. अंतिम टक्केवारीचे परिगणन करण्यासाठी खालीलप्रमाणे निकष वापरण्यात येतील.

I) उमेदवाराने सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रमाचे प्रथम/द्वितीय वर्ष प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण केले असल्यास दोन्ही वर्षात मिळविलेली टक्केवारी अंतिम परिगणनाकरिता गृहीत धरण्यात येईल.

II) उमेदवाराने सहायक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रमाचे प्रथम/द्वितीय वर्ष दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केले असल्यास त्या-त्या संबंधित वर्षात म्हणजे प्रथम/द्वितीय वर्षात मिळविलेल्या टक्केवारीमधून 1 टक्का गुण वजा करुन अंतिम टक्केवारीचे परिगणन करण्यात येईल.

III) उमेदवाराने सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रमाचे प्रथम/द्वितीय वर्ष तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केले असल्यास त्या-त्या संबंधित वर्षात म्हणजेच प्रथम/द्वितीय वर्षात मिळविलेल्या टक्केवारीमधून 2 टक्के गुण वजा करून अंतिम टक्केवारीचे परिगणन करण्यात येईल.

IV) सहाय्यक परिचारिका प्राविका अभ्यासक्रमाचे प्रथम/द्वितीय वर्ष यापैकी कोणतेही वर्ष 3 पेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही. समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना जन्मतारखेनुसार योजेष्ठतेने प्राधान्यक्रम देण्यात येईल.

वेतन (Salary)

• M – 15 – रु. 25,500 – 81,100/-

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता

“मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई – 400 012”

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी

दि.16.01.2023 ते दि. 25.01.2023 पर्यंत (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टया वगळून) सकाळी 11.00 ते सायं. 5.00 या वेळेत अर्ज सादर करावा.

अर्जाचे शुल्क (Application Fee)

• अर्जाचे शुल्क (Fee) लागू नाही.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

• आरोग्य केंद्र, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा

FAQs

प्रश्न 1. मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 एकूण किती जागांसाठी आयोजित केली आहे? (How many vacancy released under BMC Assistant Nurse Bharti 2023?)

उत्तर. मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 एकूण 421 रिक्त जागांसाठी आयोजित केली आहे.

प्रश्न 2. मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख कोणती आहे? (What is the last date of send application BMC Assistant Nurse Bharti 2023?)

उत्तर. मुंबई महानगरपालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 ही आहे.

प्रश्न 3. मुंबई महापालिका सहाय्यक परिचारिका भरती 2023 साठी अर्ज करण्याचा पत्ता कोणता आहे? (What is the address of send application BMC Assistant Nurse Bharti 2023?)

उत्तर. मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई – 400 012.

प्रश्न 4. बृहन्मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट कोणती आहे? (What is BMC portal?)

उत्तर. www.mcgm.gov.in

Leave a Comment