MPSC Group B and C Recruitment 2023: 8169 जागांसाठी मेगाभरती मुदत वाढ

MPSC Group B and C Recruitment 2023: 8169 जागांसाठी मेगाभरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या “गट ब व गट क” संवर्गातील MPSC Group B and C Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 8169 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 25 जानेवारी 2023 ते 14 फेब्रुवारी 2023 21 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील (Overview)

भरती मंडळमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
नोकरीची श्रेणीMPSC Group B and C
पदाचे नावगट ब व क संवर्गातील पदे
एकूण जागा8169
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात25 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख21 फेब्रुवारी 2023
निवड पद्धतपूर्व व मुख्य परीक्षा
अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in

राज्यसेवा गट ब व क अधिसूचना (MPSC Group B and C Notification)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या “गट ब व गट क” संवर्गातील MPSC Group B and C Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 8169 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

भरतीचे नावअधिसूचनेची PDF
MPSC Group B and C Recruitment Notification 2023येथे डाऊनलोड करा

राज्यसेवा गट ब व क ऑनलाईन अर्ज (MPSC Group B and C Apply Online)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या “गट ब व गट क” संवर्गातील MPSC Group B and C Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 8169 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 20 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे 25 जानेवारी 2023 ते 14 फेब्रुवारी 2023 21 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

भरतीचे नावऑनलाईन अर्ज
MPSC Group B and C Recruitment 2023 Apply Online Apply Here

महत्वाच्या तारखा (Important Dates)

MPSC group B & C apply online starting list25 जानेवारी 2023
MPSC group B & C apply
online last date
21 फेब्रुवारी 2023
MPSC group B & C Prelims Date30 जानेवारी 2023
MPSC group B & C Prelims Date02 सप्टेंबर 2023
MPSC group B main exam Date09 सप्टेंबर 2023

पदांचा तपशील (Vacancy Details)

पदाचे नावरिक्त जागा
सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)78
राज्य कर निरीक्षक (STI)159
पोलीस उपनिरीक्षक (PSI)374
दुय्यम निरीक्षक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक49
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क06
तांत्रिक सहाय्यक01
कर सहाय्यक468
लिपिक-टंकलेखक7034
एकूण8169

राज्यसेवा गट ब व क पात्रता निकष (MPSC Group B and C Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट क संवर्ग वगळता इतर संवर्गातील पदेपदवी उत्तीर्ण
उद्योग निरीक्षक, गट कसिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदवी
किंवा
विज्ञान शाखेतील पदवी

शारीरिक निकष (Physical Eligibility)

पोलीस उपनिरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांसाठी किमान शारीरिक निकष खालील प्रमाणे आहे :-

पदाचे नावपुरुषमहिला
पोलीस उपनिरीक्षक1) उंची – 165 सें. मी.
2) छाती – न फुगवता 79 सें. मी., फुगविण्याची क्षमता किमान 5 सें.मी. आवश्यक
1) उंची – 157 सें. मी.
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क1) उंची – 165 सें. मी.
2) छाती – न फुगवता 79 सें. मी., फुगविण्याची क्षमता किमान 5 सें.मी. आवश्यक
1) उंची – 155 सें. मी.
2) 50 कि. ग्रॅ.

टायपिंग अर्हता (Typing Eligibility)

कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गासाठी खालील प्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे.

कर सहाय्यकलिपिक – टंकलेखक
मराठी – किमान 30 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी – किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
मराठी – किमान 30 शब्द प्रति मिनिट
इंग्रजी – किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा (Agelimit)

पदाचे नावकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा (खुला)कमाल वयोमर्यादा (मागासवर्गीय)
सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)18 वर्षे38 वर्षे43 वर्षे
राज्य कर निरीक्षक (STI)19 वर्षे38 वर्षे43 वर्षे
पोलीस उपनिरीक्षक (PSI)19 वर्षे31 वर्षे34 वर्षे
दुय्यम निरीक्षक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक19 वर्षे38 वर्षे43 वर्षे
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क18 वर्षे38 वर्षे43 वर्षे
तांत्रिक सहाय्यक19 वर्षे38 वर्षे43 वर्षे
कर सहाय्यक18 वर्षे38 वर्षे43 वर्षे
लिपिक-टंकलेखक19 वर्षे38 वर्षे43 वर्षे

वतन (Salary)

पदाचे नाववेतन
सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)S – 14 : रु. 38600 – 122800
राज्य कर निरीक्षक (STI)S – 14 : रु. 38600 – 122800
पोलीस उपनिरीक्षक (PSI)S – 14 : रु. 38600 – 122800
दुय्यम निरीक्षक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षकS – 14 : रु. 38600 – 122800
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्कS – 12 : रु. 32000 – 101600
तांत्रिक सहाय्यकS – 10 : रु. 29200 – 92300
कर सहाय्यकS – 8 : रु. 25500 – 81100
लिपिक-टंकलेखकS – 6 : रु. 19900 – 63200

परीक्षेचे टप्पे

• सर्व पदांसाठी पूर्व परीक्षा 100 गुणांची होईल.

• मुख्य परीक्षा

पदाचे नावमुख्य परीक्षेचे गुण
सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)400
राज्य कर निरीक्षक (STI)400
पोलीस उपनिरीक्षक (PSI)400
दुय्यम निरीक्षक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक400
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क200
तांत्रिक सहाय्यक200
कर सहाय्यक200
लिपिक-टंकलेखक200

• पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल.

• शारीरिक चाचणीमध्ये किमान 70 गुण धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता 40 गुणांची मुलाखत घेण्यात येईल.

पूर्व परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत

• ऑनलाइन अर्जाची लिंक 25 जानेवारी 2023 ते 14 फेब्रुवारी 2023 यादरम्यान सक्रिय राहिल.

• अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे करणे आवश्यक आहे.

• ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट – www.mpsconline.gov.in

• आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.

• विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे.

• परीक्षा शुल्क भरणे.

• जिल्हा केंद्र निवडणे.

परीक्षा शुल्क (Exam Fee)

परीक्षेचे नावअमागासमागासवर्गीय,/आ.दु.घ./अनाथ
संयुक्त पूर्व परीक्षारु.394रु.294
मुख्य परीक्षारु.544रु.344
अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Here

FAQs

प्रश्न. 1. 2023 मध्ये राज्यसेवा परीक्षा कधी घेतली जाईल? (When MPSC exam is conducted IN 2023?)

उत्तर. MPSC Group B and C Recruitment 2023 ची संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होईल , तर गट ब मुख्य परीक्षा 02 सप्टेंबर 2023 व गट क मुख्य परीक्षा 09 सप्टेंबर 2023 रोजी होतील.

प्रश्न. 2. राज्यसेवा गट क साठी अर्ज कसा करावा? (How to apply for MPSC Group C?)

उत्तर. • ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट – www.mpsconline.gov.in • आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे. • विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. • परीक्षा शुल्क भरणे. • जिल्हा केंद्र निवडणे.

प्रश्न 3. MPSC मध्ये गट क अंतर्गत कोणती पदे येतात? (Which post comes under Group C in MPSC?)

उत्तर. MPSC गट C सेवा परीक्षा उद्योग निरीक्षक, उपनिरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक रिक्त पदांच्या भरतीसाठी आयोजित केली जाणार आहे.

प्रश्न 4. MPSC गट ब अंतर्गत कोणती पदे येतात? (What are Group B posts in MPSC?)

उत्तर. MPSC गट ब अंतर्गत सहाय्यक विभाग अधिकारी, उपनिरीक्षक आणि राज्य कर निरीक्षक यासारख्या पदांचा समावेश आहे.

प्रश्न 5. MPSC गट ब व गट क पदांसाठी वेतन किती आहे? (What is the salary for the post of MPSC Group B and C?)

उत्तर. रु.19,900 ते 1,22,800 पर्यंत वेतन असेल.

Leave a Comment