Maharashtra Van Vibhag Bharti 2023: लेखापाल पदाच्या 127 जागांसठी जाहिरात प्रसिद्ध

Maharashtra Van Vibhag Bharti 2023: लेखापाल पदाच्या 127 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत Maharashtra Van Vibhag Bharti 2023 अंतर्गत लेखापाल (Account) या पदाच्या एकूण 127 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mahaforest.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपण या लेखात Maharashtra Van Vibhag Lekhapal Bharti 2023 संबंधित सर्व माहिती म्हणजेच, जागांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, अर्जाचे शुल्क या संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तरी हा लेख काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत वाचावा.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळमहाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र राज्य
नोकरीची श्रेणीMaharashtra Sarkari Naulari
पदाचे नावलेखापाल (Account)
एकूण जागा 127
निवड पद्धतलेखी परीक्षा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीखComming Soon
अधिकृत वेबसाईटwww.mahaforest.gov.in

Read also : Bombay High Court Law Clerk Bharti 2023: 50 जागा, डायरेक्ट भरती, लगेच अर्ज करा (Last Date – 20 मार्च 2023)

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Notification | महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अधिसूचना

महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत Maharashtra Van Vibhag Bharti 2023 अंतर्गत लेखापाल (Account) या पदाच्या एकूण 127 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mahaforest.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

Click here to download Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Notification

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Apply Online | महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत Maharashtra Van Vibhag Bharti 2023 अंतर्गत लेखापाल (Account) या पदाच्या एकूण 127 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Click here to Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Apply Online (लिंक लवकरच सक्रिय होईल)

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध1 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात
Maharashtra Van Vibhag Bharti 2023 online form last date

Maharashtra Van Vibhag Lekhapal Vacancy | महाराष्ट्र वन विभाग लेखापाल पदाचा तपशील

पदाचे नावरिक्त जागा
लेखापाल (गट क)127

Maharashtra Van Vibhag Lekhapal Qualification | महाराष्ट्र वन विभाग लेखापाल शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखापाल (गट क)I) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा.
II) मराठी भाषेचे ज्ञान.

Maharashtra Van Vibhag Lekhapal Agelimit | महाराष्ट्र वन विभाग लेखापाल वयोमर्यादा

वयोमर्यादा गणण्याची तारीख :- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख

• लेखापाल या पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे असेल :-

घटककिमान वयकमाल वय
अमागास1838
मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.1843
प्राविण्य प्राप्त खेळाडू1843
माजी सैनिक1838 + सैनिकी सेनेचा कालावधी + 3
दिव्यांग1845
प्रकल्पग्रस्त1845
भूकंपग्रस्त1845
पदवीधर अंशकालीन कर्मचारी1855
रोजंदारी मजूर1855

Read also : NIC Scientific Officer Bharti 2023: राष्ट्रीय माहिती केंद्रामध्ये 598 वैज्ञानिकांची बंपर भरती (Last Date – 4 एप्रिल 2023)

Maharashtra Van Vibhag Lekhapal Salary | महाराष्ट्र वन विभाग लेखापाल पगार

पदाचे नावपगार
लेखापाल (गट क)S -10 रु. 29,000 – 92,300

Maharashtra Van Vibhag Lekhapal Selection Process | महाराष्ट्र वन विभाग लेखापाल निवड प्रक्रिया

• ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, 200 गुणांची (एकूण 100 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) स्पर्धात्मक लेखी परीक्षा TCS ION (Tata Consultancy Services Ltd) आमचे मार्फत घेण्यात येईल लेखी परीक्षेचे खालील प्रमाणे स्वरूप देण्यात आले आहे :-

विषयगुण
मराठी50
इंग्रजी50
सामान्य ज्ञान50
बौद्धिक चाचणी50
एकूण200

• लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिका दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (12 वी) दर्जाच्या समान राहील.

• परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने (CBT) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येईल.

• परीक्षेचा कालावधी 2 तासांचा राहील.

How to apply for Maharashtra Van Vibhag Bharti 2023?

• उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनविभागासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल. एक पेक्षा अधिक वनवृत्तासाठी अर्ज सादर केल्याचे आढळल्यास पहिला सादर केलेला अर्ज ग्राह्य धरून इतर अर्ज रद्द ठरतील. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केलेला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल व निवड झाल्यास त्याच वनवृत्तात पदस्थापना करण्यात येईल.

• अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

• उमेदवाराला ________ या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. उमेदवाराने आपल्या उजव्या बाजूला असलेल्या ‘सूचना‘ या पर्यायावर क्लिक करावे. तिथून उमेदवारला थेट नोंदणीच्या पोर्टलवर नेले जाईल. पहिल्यांदाच नोंदणी केली जात असल्यास उमेदवाराने नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून युजर नेम, पासवर्ड आणि ई-मेल आयडी टाकावा. उमेदवाराला त्यानंतर त्याच्या/तिच्या प्रमाणित ई-मेल आयडीवर सक्रियतेची लिंक मिळेल जी त्याच्या साईनअपशी संबंधित असेल. उमेदवाराने त्याचे तिचे खाते सक्रिय करण्यासाठी त्याच्या/तिच्या ई-मेल आयडीवर मिळालेल्या सक्रियतेच्या लिंकवर क्लिक करावे (Activation लिंक ही 2 दिवसाकरिता active असेल). उमेदवाराने त्याची/तिची लॉगइनची माहिती गोपनीय ठेवावी. एकदा खाते सक्रिय झाले की, उमेदवाराला त्यांच्या नोंदणी पोर्टलचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून केव्हाही लॉग इन होता येईल. युजर नेम व पासवर्ड जतन करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.

• उमेदवाराचे नाव, वडिलांचे पतीचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.

छायाचित्र आणि स्वाक्षरी आपलोड करण्यासंबंधी माहिती कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी 200 pixel असलेले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा आणि अर्जामध्ये अपलोड करा. प्रतिमेची उंची 60 pixel आणि रुंदी 140 pixel असावी. प्रतिमेचे आकारमान 3 KB ते 50 KB च्या दरम्यान असावे. उमेदवाराने अलीकडील छायाचित्र (फोटोग्राफ) अपलोड करणे आवश्यक आहे.

• पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्याचा प्रकार निश्चित करावा. उदा. कायमस्वरूपी पत्ता किंवा दोन्ही आणि त्यानुसार आपले गाव, पोस्ट ऑफिस, जिल्हा, राज्य, पिन कोड इ. सहित माहिती भरावी.

• त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी. उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल. असल्यास ड्रॉपडाउन मधून त्याने/तिने आपला जात प्रवर्ग निवडावा.

• ज्यांच्या कडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी. तसेच उमेदवाराने आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी. समांतर आरक्षण (लागू असल्यास) त्यासंबंधीची माहिती द्यावी लागेल.

• तसेच मराठी भाषेतील प्राविण्य, संगणक अर्हता प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतक-याचे पाल्य, अपंगत्वाचा प्रकार (लागू असल्यास) या यासंबंधीची माहिती द्यावी लागेल.

• शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेमध्ये नमूद केल्याप्रमाणे माहिती देणे अनिवार्य आहे.

• एकदा शैक्षणिक तपशील प्रविष्ट केले की, अर्जदारास पुढे” या बटनावर क्लिक करावे. लागेल. त्या बटनावर क्लिक केल्या नंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशीलात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

• उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो. उमेदवाराने आपल्या अर्जात उपलब्ध करून देण्यात आलेल्या तीनही पसंतीक्रमाच्या यादीतील प्रत्येकी एका पर्यायाची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रमात उमेदवाराने निवडलेल्या पर्यायापैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी केंद्र नेमून देण्यात येईल.

• उमेदवाराने सगळ्या नियम व अटी वाचून मान्यता दर्शविण्यासाठी दिलेल्या जागी क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाइन पध्दतीने (इंटरनेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड, भीम (UPI) आवश्यक तो परीक्षा शुल्क भरणा करावा. मान्यता दर्शविल्यानंतरच अर्ज दाखल करण्यासाठीचा “सबमीट” हा पर्याय उपलब्ध होईल. उमेदवाराला त्याचा अर्ज डाउनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय असेल.

Application Fee | अर्जाचे शुल्क

प्रवर्गशुल्क
खुलारु. 1000/-
मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.रु. 900/-
माजी सैनिक00
अधिकृत वेबसाईटwww.mahaforest.gov.in
अधिसूचना (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply here

Q1. How many vacancies announced under the Maharashtra Van Vibhag Bharti 2023?

And. There are total 127 vacancies post of Lekhapal announced under the Maharashtra Van Vibhag Bharti 2023.

Q2. What is the age limit for Maharashtra Forest Bharti?

Ans. The age limit for Maharashtra Forest Bharti is 18 to 38 yrs for Lekhapal post.

Q3. What is the salary for Maharashtra Forest Lekhapal per month?

Ans. The salary for Maharashtra Forest Lekhapal per month S -10 रु. 29,000 – 92,300.

Leave a Comment