DVET Craft Instructor Bharti CBT 2 Exam 2022: CBT 2 साठी ऑनलाईन अर्ज सुरु, 14 मार्च 2023
कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्य विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध व्यवसायातील DVET Craft Instructor Bharti 2022 अंतर्गत शिल्प निर्देशक (गट क) संवर्गातील 1457 पदे भरण्याकरिता 17 ऑगस्ट 2022 रोजी www.bvet.gov.in या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 28 व 29 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या सामाईक परीक्षेत (CBT – 1) किमान 45 टक्के गुण प्राप्त करून 45,113 उमेदवार व्यवसाय चाचणी करिता (CBT – 2 ) पात्र ठरल्याचे व किमान 45 टक्के गुण प्राप्त न केल्यामुळे व्यवसायिक चाचणी तसेच पुढील भरती प्रक्रिया करता 5361 उमेदवार पात्र ठरल्याचे 23 फेब्रुवारी 2023 रोजी DVET Craft Instructor Recruitment 2022 CBT 1 Result : निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रथम उमेदवारांना व्यवसायिक चाचणी CBT 2 करिता अर्ज करण्याची लिंक त्यांच्या लॉगिन आयडी मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
DVET Craft Instructor Bharti 2022 CBT 2 Apply Online
तरी व्यवसाय चाचणी करिता पात्र ठरलेल्या उमेदवाराने 8 मार्च 2023 ते 14 मार्च 2023 या कालावधीत व्यवसायिक चाचणी करिता ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
Click here to DVET Craft Instructor Bharti 2022 CBT 2 Apply Online
DVET Craft Instructor CBT 2 Pattern | DVET शिल्प निर्देशक व्यवसाय चाचणीचे स्वरूप
