Bombay High Court Bharti 2023: 4 थी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयत सरकारी नोकरी, 16600 ते 52400 पगार

मुंबई उच्च न्यायालयामार्फत Bombay High Court Bharti 2023 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठा या आस्थापनेवर “स्वयंपाकी” (Cook) या पदाच्या एकूण 03 पदांच्या भरतीसाठीची जाहिरात 10 एप्रिल 2023 रोजी www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 10 एप्रिल 2023 ते 02 मे 2023 यादरम्यान ऑफलाईन (विहित नमुन्यातील) पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

या लेखात आपण Bombay High Court Bharti 2023 संबंधित पात्रता, रिक्त जागांचा तपशील, निवड प्रक्रिया, अर्ज सादर करण्याची पद्धत इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळमुंबई उच्च न्यायालय
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Aurangabad Job
पदाचे नावस्वयंपाकी (Cook)
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन (विहित नमुन्यात)
अर्च सादर करण्याची मुदत10 एप्रिल 2023 ते 02 मे 2023
निवड पद्धतप्रात्यक्षिक परीक्षा/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.bombayhighcourt.nic.in

Bombay High Court Recruitment 2023 Notification | जाहिरात PDF

मुंबई उच्च न्यायालयामार्फत Bombay High Court Bharti 2023 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठा या आस्थापनेवर “स्वयंपाकी” (Cook) या पदाच्या एकूण 03 पदांच्या भरतीसाठीची जाहिरात 10 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Bombay High Court Bharti 2023: 4 थी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयत सरकारी नोकरी, 16600 ते 52400 पगार

जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Bombay High Court Bharti 2023: 4 थी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयत सरकारी नोकरी, 16600 ते 52400 पगार

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा | Important Dates

जाहिरात प्रसिद्ध10 एप्रिल 2023
अर्ज स्विकारण्यास सुरुवात10 एप्रिल 2023
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख02 मे 2023

रिक्त जागांचा तपशील | Bombay High Court Cook Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
स्वयंपाकी (Cook)03

शैक्षणिक पात्रता |Bombay High Court Cook Educational Qualification

i) उमेदवार 4 थी पास असावा.

ii) मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक.

iii) स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक.

iv) उमेदवारास सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक.

वयोमर्यादा | Agelimit

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला18 वर्षे38 वर्षे
मागासवर्ग18 वर्षे43 वर्षे

पगार | Bombay High court Cook Salary

• सातव्या वेतन आयोगानुसार मॅट्रिक्स S – 3 : 16,600/- ते 52,400/-

निवड प्रक्रिया | Selection Process

• उमेदवारांची निवड ही स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

• जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार तसेच स्वयंपाकी कामाच्या अनुभवानुसार उमेदवारांची अल्पसूची (Shortlisting) प्रसिध्द करण्यात येईल.

• अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, अल्पसूची प्रसिध्द केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच (Shortlisted candidate) – “Registrar High Court Bench at Aurangabad” यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेतून रुपये 200/- ना धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल. सदरील शुल्क ना-परतावा राहील.

• प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रीयेस सामोरे जावे लागेल –

मूल्यांकन पध्दतीगुण
स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा
(उत्तीर्ण गुण किमान 15 )
30
शारीरिक कार्यक्षमता चाचणी10
तोंडी मुलाखत10
निवड प्रक्रियेचे एकूण गुण50

अर्ज कसा करावा? | How to apply?

• अर्ज पाठवताना पाकिटावर “स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज” असे ठळक अक्षरात लिहावे.

• अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वत:चे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (फोटो) चिकटवावे.

• स्वयंपाकी पदासाठी इयत्ता चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदा. 10 वी / 12 वी / पदवी असेल व त्याच्याकडे / तिच्याकडे इयत्ता चौथी। चे गुणपत्रक नसेल तर त्याने/तिने अर्ज भरताना इयत्ता चौथी करिता काल्पनिकरित्या 50% गुणांची (उदा. एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त) नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी.

• राज्य शासनाच्या इतर विभागात असलेल्या कर्मचान्यांनी त्यांचा अर्ज योग्य मार्गाने त्यांच्या कार्यालय प्रमुखा मार्फतच पाठवावा.

• ज्या उमेदवाराकडे कुकींग मधील पदवी, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अथवा पंचतारांकित / चितारांकित हॉटेलमध्ये शेफ / स्वयंपाकी म्हणून काम करण्याचा अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडे स्वयंपाकी म्हणून काम केल्याचा / करीत असल्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित (self attested) केलेल्या छायांकित प्रति सादर कराव्यात –

i) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (उदा. 4थी, 7वी, 10वी, 13वी आणि पदवी इत्यादी),

ii) जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जन्मतारखेचा पुरावा

iii) उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला.

iv) जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी).

v) स्वयंपाकाचा पुर्वानुभव असल्यास संबंधीत हॉटेल / केटरींग व्यावसायिकाने दिलेला दाखला विशेष पाककृती संबंधी प्राविण्याबाबतचा दाखला (असल्यास)

vi) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

vii) विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तऐवज उदा. शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.

ix) सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.

x) विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला,

xi) न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज.

• उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले/ कागदपत्रे जोडावीत-

i) जाहिरात प्रसिध्दीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र (त्यांचा हुद्दा, पत्ता व संपर्क क्रमांक) [जाहिरातीसोबत परिशिष्ट- ‘व’ नमुन्यात]

ii) लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापन [जाहिरातीसोबत नमुना ‘अ’ प्रमाणे ]

iii) उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजुरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.

iv) अर्जासोबत स्वतः चा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवावे.

v) पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवावा.

vi) उमेदवाराने त्याला बनवता येणान्या खाद्यपदार्थांची यादी अर्जासोबत जोडावी.

पोस्टाद्वारे अर्ज पाठविण्याचा पत्ता व व वेळ

इच्छुक उमेदवारांनी त्याचे अर्ज विहीत नमुन्यात [जाहिरातीसोबत परिशिष्ट- ‘अ’ प्रमाणे] आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह दिनांक 02 मे 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत (Speed Post) पुढील पत्त्यावर पाठवावेत.

“प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद – 431009”

स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटwww.bombayhighcourt.nic.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
अर्जाचा नमुना (Application Form)येथे डाऊनलोड करा
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Leave a Comment